मेकअप नव्हे शस्त्र पूजन करणे आवश्यक : डॉ. प्रवीण तोगडिया
नवरात्र उत्सव महासंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो ): दुर्गा मातेने ज्याप्रमाणे नऊ दिवस महिषासुर राक्षसासोबत युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुर राक्षसाचा वध केला. त्याच गोष्टीचे स्मरण राहावे याकरता नवरात्र उत्सव साजरी केली जाते आणि त्याचाच आनंद म्हणून गरबा हा खेळला जातो. मात्र दुर्गा मातेच्या १६ हातात मेकअप चे कोणतेही साहित्य नसून आसुरी शक्तीचा नाश करणारी शस्र असल्याचे सांगत प्रत्येक माता भक्तांनी शत्र पूजन करा असे आवाहन अंतराष्ट्रीय हिंदू परिषद व बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी शपथ देत केले.
छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव महासंघाच्या कार्यालयाचे सोमवारी डॉ. तोगडीयांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण जाधव, विजयराव साळवे, संजय भन्साळी, देवगिरी प्रांत अध्यक्ष सुभाष मोकरीये यांची प्रमुख उपास्थिती होती.
सार्वजनिक नवरात्र उत्सव महासंघाच्या अध्यक्षा मनीषा संजय भन्साळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरवात झाली असून ९ दिवस संस्कृती आणि परंपरेचा जागर दुर्गा मातेच्या नित्य पूजनाने होणार आहे. युवती व महिला स्वसंरक्षणाचा संकल्प करत छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव महासंघाच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असून शहरातील माता भक्तांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्षा मनीषा संजय भन्साळी यांनी केले.
या उदघाटन प्रसंगी कार्याध्यक्ष सचिन देशमुख, विनोद माने, प्रशांत दहीवाडकर, नितीन देशमुख, विधिज्ञ निनाद खोचे, कल्याण खोले, पारस जैन, समाधान जरांगे, संजय संचेती, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, ईश्वर नरवडे, मीरा परदेशी, अनिल वरटे, नितेश तायडे, मंगेश सरवदे, जितेंद्र कोठारी, संजय फत्तेलष्कर, महावीर भन्साळी महासंघाच्या उपाध्यक्षा किरण शर्मा, स्मिता साहुजी, मधुकांता छाजेड, भौरीलाल छाजेड, मनीषा जैन यांच्यासह छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक नवरात्र उत्सव महासंघाचे सदस्य, पदाधिकारी, तसेच माता भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.